नवी दिल्ली : देशभरात सध्या सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्याच्या हेतूने प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी दृक्श्राव्य पद्धतीने गायलेले गीत आज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते प्रसारित करण्यात आले.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील ज्येष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी या गीताची निर्मिती केली आहे.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की, ‘पुढच्या आठवड्यात भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांनी 100 कोटींचा टप्पा गाठण्यात यश मिळवलेले असेल. मार्च 2020 मध्ये जेव्हा देशात टाळेबंदी लागली तेव्हा आपण या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय सामग्रीसाठी आयातीवर अवलंबून होतो, मात्र थोड्याच कालावधीत या सर्व गोष्टींचे उत्पादन देशात करण्याची क्षमता प्राप्त करून कोणत्याही बिकट प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे हरदीप पुरी यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधानांचे द्रष्टे नेतृत्व आणि सर्वांनीच दिलेल्या योगदानामुळे हे शक्य होऊ शकले, असंही त्यांनी म्हंटल आहे.
लोकप्रिय गायक सामान्य लोकांच्या कल्पनाशक्तीवर चटकन प्रभाव पाडू शकतात आणि कैलाश खेर यांनी गायलेले हे गाणे लोकांच्या मनातील गैरसमजुती दूर करून लसीकरण करून घेण्याविषयी जागृती करू शकतील असा विश्वास केंद्रीय मंत्री पुरी यांनी व्यक्त तयावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला


