Share

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खा.भावना गवळींनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पण ही प्रक्रिया किचकट ठरत असून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे. ई-पीक पाहणीत विविध स्वरूपातील अडचणी निर्माण झाल्यात. त्या तत्काळ दूर करण्यात याव्यात, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी कृषी विभागाला दिले आहे.

वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही स्मार्ट फोन नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाईल हाताळताही येत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेचा बोजवारा उडवायचा नसेल तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या-त्या गावच्या कृषी सहायकावर निश्चित करायला हवी. शासनाने सर्व जबाबदारी शेतक-यांवर दिल्याने त्रुटी राहण्याची शक्यता अधिक असून त्याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात तसेच तलाठी व कृषी सहाय्यकांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश खा. गवळी यांनी दिले आहे.

दरम्यान, पीक पेरा ई-पीक नोंदणीद्वारे करण्याचे सरकारने आदेश काढल्याने शेतकरी अडचणीत सापडलेत. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे तक्रार करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नसल्याने ते वैतागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने खा. गवळी यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना ई पीक पाहणी अॅपमधील अडचणी दुर करण्याचे निर्देश दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!