Share

‘एक दिवस आमचे आयुष्य जगून बघा’, डॉक्टरांचं पंतप्रधानांना पत्र

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: ‘आम्हाला आपल्यासारखे सक्रिय पंतप्रधान मिळाले आहेत, हे आमचे भाग्य आहे. आता आम्ही आपल्याला विनंती करतो की, आपण आमचा पांढरा कोट अंगावर चढवावा आणि सरकारी डॉक्टर म्हणून काम करून पहावे. उपचार मिळू न शकलेल्या रुग्णाचा संताप, संसाधने आणि पायाभूत सुविधा नसल्याने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली वैद्यकीय व्यवस्था पाहिल्यावर तुम्हाला आमच्यावर असलेल्या असह्य ताणाची कल्पना येऊ शकेल, ‘आपण केवळ एक दिवस आमचे आयुष्य जगलात तर तो वैद्यकीय व्यवस्थेतील मैलाचा दगड ठरेल आणि लोकांचा वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वासही वाढेल,’ अशा आशयाच पत्र ‘एम्स’च्या निवासी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहल आहे. राजस्थानमध्ये सरकारी डॉक्टरांनी वेतनवाढ आणि बढतीसाठी छेडलेल्या आंदोलनाला या पत्रातून पाठींबा दिला आहे. हे पत्र ‘एम्स’च्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष हरजति सिंग भट्टी यांनी लिहिले आहे.

दरम्यान, राजस्थान सरकारने ८६ डॉक्टरांवर ‘रेस्मा’ लादून त्यांना अटक केली आहे. या विरोधात राजस्थानचे सरकारी डॉक्टर्स १६ डिसेंबरपासून संपावर आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!