मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आधारित अभिजित पानसे दिग्दर्शित ‘राजी-नामा’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ही वेबसिरीज झळकणार आहे.
अभिजित पानसे यांच्या ‘रानबाजार’ वेबसिरीजला लोकांनी चांगली पसंती दिली. आता यानंतर अभिजित पानसे आणि चिन्मय मांडलेकर यांची जोडी ‘राजी-नामा’ ही वेबसिरीज प्रदर्शित करणार आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक राजकीय सनसनाटी विषय पाहण्यास मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/Cfd9kyzMwnn/
अभिजित पानसे यांनी स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, महाराष्ट्रात ‘रानबाजार’ सुरूच आहे…आता “राजी-नामा” देतोय! प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित, लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर – “राजी-नामा” सध्या त्यांची ही इंस्टाग्राम पोस्ट खूप चर्चेचा विषय बनली आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


