मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचं जेवण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत देशमुखांचा विनंती अर्ज फेटाळून लावत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्याच दिवशी त्यांची बदली केली.
न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानं १५ नोव्हेंबरला न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची प्रशासकीय कारणांमुळे तातडीनं बदली करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला होता. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या बदलीला सुप्रीम कोर्टाने देखील १३ नोव्हेंबर रोजी संमती दिली होती. बदलीचा आदेश मिळताच न्यायाधीश एच. एस. सातभाई हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या प्रकरणांची सुनावणी झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणांचा समावेश आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या पंकज भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- काही तरी द्या वाल्या लोकांची वेदना मी समजू शकतो; राऊतांचा फडणवीसांना टोला
- न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल; ‘या’ खेळाडूंसह ‘हिटमॅन’ उतरणार मैदानात!
- ‘मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते? ते काय कोविड न होणारं जॅकेट घालून येतात का?’
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

