Share

काही तरी द्या वाल्या लोकांची वेदना मी समजू शकतो; राऊतांचा फडणवीसांना टोला

Published On: 

मुंबई : भाजपची बुधवारी कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि इतर भाजपचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली गेली. राज्यात कायद्याचं नाही तर भ्रष्टाचाराचं राज्य सुरु झालं असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या टीकेली उत्तर देताना संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात काही तरी द्या असं राज्य होतं. ते 2 वर्षापूर्वी घालवून कायद्याचं राज्य आलं आहे. त्यामुळे काही तरी द्या वाल्या लोकांची ही वेदना मी समजू शकतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना राऊतांनी फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोण होतास तू, काय झालास तू’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांंना जोरदार टोला लगावला. त्यावर राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर पलटवार केला आहे.

ते खूप जूनी ऐकतात. त्यांना भरपूर वेळ आहे. आम्ही कोण आहोत हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही काय होतात… तुमची काय अवस्था झाली हे सर्वांना माहीत आहे. ही अवस्था अशीच राहिली तर पुण्यताील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करण्याची वेळ शकेल. अशी वेळ येऊ नये ही प्रार्थना करतो. निराशाचं अजीर्ण झालं तर असं होतं. फ्रस्टेशन आहे. निराशा आहे. जेव्हा निराशा प्रमाणाबाहेर जाते तेव्हा अशी वक्तव्य येतात, असा चिमटा त्यांनी काढला, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!