Share

न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल; ‘या’ खेळाडूंसह ‘हिटमॅन’ उतरणार मैदानात!

Published On: 

जयपूर : आजपासून भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर न्यूझीलंड संघ थेट भारतात पोहचला आहे. तर भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. तसेच कोहलीने स्पर्धेपूर्वीच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपद सोडले. त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे आता ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी आता भारतीय क्रिकेटचा नवा पर्व सुरु करणार आहे.

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्ड कप खेळणारे 8 खेळाडू ही सीरिज खेळणार नाहीत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे तर, राहुल चहर, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना संघातून वगळण्यात आले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये हार्दिक पांड्याऐवजी व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली, तर युझवेंद्र चहलने देखील पुनरागमन केलं आहे. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरनेही पुनरागमन केलं आहे.

रोहित ‘या’ खेळाडूंसह उतरणार मैदानात?

रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!