औरंगाबाद : सध्या राज्यात आरक्षणाचे वारे सुसाट वाहू लागले आहे. मराठा तसेच ओबीसींच्या आरक्षणाने सध्या जोर धरला आहे. दि. २६ रोजी भाजपच्या वतीने उग्र चक्का जाम आंदोलन आकाशवाणी चौकात करण्यात येणार आहे. यासाठी ओबीसीसमाज बांधवांसह भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्या विरोधात ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरत, पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता यात भाजपने दि. २६ रोजी आकाशवाणी चौकात चक्का जाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, या आंदोलनात ओबीसी समाज बांधवांसह भाजप कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन संजय केनेकरांनी केले आहे. सध्या भाजप सत्ताधाऱ्यांना आरक्षणाच्या कचाट्यात पकडण्याची एकही संधी सोडत नसताना, शनिवारी होणाऱ्या आंदोलनाचे किती पडसाद पडतात या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
