Share

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा; संजय राऊतांचं आवाहन

Published On: 

मुंबई:- गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी वाऱ्याची आणि सरकारने सुरु केलेल्या दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी दटून बसला आहे. नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले आहे.

शेतकरी हा संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेलो असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला आपण साथ द्यावी. कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. हा विषय देशव्यापी झाला आहे. सरकारनं दिल्लीत मागच्या १२ दिवसांपासून दडपशाही सुरु केली आहे. म्हणून स्वेच्छेन या बंदमध्ये सहभागी व्हावं, असे आवाहन संजय राऊतांनी जनतेला केलं आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!