Share

जॉनी बेअरस्टोचा जबरदस्त षटकार ; फ्रीजच्या फुटल्या काचा

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात जोरदार झाली.डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही सलामीवीरानी ५ षटकाच्या आतच अर्धशतकी धावांची सलामी दिली. जॉनी बेअरस्टोने तर मुंबईच्या गोलंदाजांविरोधात जोरदार फटकेबाजी केली. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात तीन चौकार व षटकार खेचला. हा षटकारामुळे डगआऊटमधील फ्रिजच्या काचा तुटल्या. या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला शेअर होत आहे. बेअरस्टोने तुफान फटकेबाजी केली मात्र, आठव्या षटकांत बेअरस्टो ४३ धावांवर बाद झाल्यानंतरही कर्णधार वॉर्नरचा तडाखा सुरुच होता.

मात्र बाराव्या षटकात हार्दिकने वॉर्नरला धावबाद केले आणि सामना मुंबईच्या बाजुने झुकला.  एक धाव घेण्याच्या नादात त्याला तंबूत जायला लागलं.हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने त्याचं काम तमाम झालं. वॉर्नर एक धाव घ्यायला गेला पण ही धाव त्याला महागात पडली. त्याने 36 धावांचे योगदान दिलं. तो जर शेवटपर्यंत पीचवर राहिला असता तर हैदराबादला सहज विजय मिळाला असता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!