मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान २९ मे रोजी बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये होणार असल्याची घोषणा केली.
यादरम्यान आयपीएलची घोषणा करताच राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ ट्विट करत आपला आनंद जाहिर केला होता. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरचे एक ट्विट रिट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये जोफ्रा म्हणतो की, ‘म्हणजे आता दुबईला जावे लागेल..’. आर्चरचे हे ट्विट सहा वर्षापुर्वीचे आहे. मात्र हे ट्विट आयपीएल संदर्भात नाही हे नक्की आहे. कारण २०१५ साली आयपीएल स्पर्धा ही भारतातच खेळवण्यात आली होती. या ट्विटला रिट्विट करताना राजस्थान रॉयल्सने ‘हे तुला ठाउक होते, जोफ’ असे लिहीले आहे.
You know it, Jof. ✈️ https://t.co/KYAPJmbR9e
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2021
या जुन्या ट्विटमुळे जोफ्रा आर्चरच्या चाहत्यांनी त्याला भवीष्यवाणी करणारा आर्चरबाबा असे संबोधले आहे. आयपीएल स्पर्धेच्या २०२१ पहिल्या टप्प्यात आर्चर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र कोरोना संसर्गामुळे स्थगीत करण्यात आलेली ही स्पर्धा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आयोजीत करण्यात आली आहे. भारतातील कोरोना परिस्थीतीमूळे ही स्पर्धा युएई येथे होणार आहे. मात्र त्या काळात इंग्लंड संघाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहता आर्चरचा सहभाग नसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चाहत्यांमुळेच क्षेत्ररक्षणात इतरापेक्षा सरस’ जडेजाने केला खुलासा
- रामदेवबाबा पुन्हा बरळले; यावेळी ‘खिलाडी’च्या खांद्यावरुन साधला ऑलोपॅथीवर निशाना
- “भावा खेळावर लक्ष दे” व्हिडीओ शेअर केल्यानंतर सैनी चाहत्याकडून ट्रोल
- वडिलांच्या निधनासाठी रुग्णालयाला जबाबदार धरत संभावना सेठने पाठवली कायदेशीर नोटीस
- ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखवर लॉकडाउनमुळे बेरोजगार होण्याची आली वेळ

