Share

एका कॅलेंडर वर्षात भारताविरुद्ध चार शतक झळकावणारा जो रुट ठरला सहावा खेळाडू

Published On: 

मुंबई : लीड्स कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला डाव ७८ धावांवर अटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली आहे. मात्र अद्यापही टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

लीड्स कसोटीत भारताविरुद्ध शतक झळकावत जो रुटने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताविरुद्ध एकाच वर्षात कसोटीत सर्वाधीक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रुटचे नाव पोहोचले आहे. वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज एव्हर्टन वीक्स, क्लाइव्ह लॉयड, शिवनारायन चंद्रपॉल आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू अरविंदा डी सिल्वा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला यांच्या यादीत आता जो रुटने जागा मिळवली आहे.

या सर्व खेळाडूंनी भारताविरुद्ध एकाच कॅलेंडर वर्षात कसोटी सामन्यात चार शतके झळकावली आहेत. यावर्षी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी चेन्नई कसोटीत जो रुटने २१८ धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्या मालिकेत जो रुटने ५४.४४ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या होत्या. तर सध्याच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत १०९, लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत १८० आणि सध्याच्या कसोटीत १२१ धावांची शतकी खेळी केली आहे.

महत्त्वाच्याा बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!