Share

जो बायडेन व अमेरिकी कंपन्यांकडून भारताच्या आर्थिक सुधारणांचे कौतुक- निर्मला सीतारामण

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण या सध्या अमेरिकेत पार पडणाऱ्या राष्ट्रीय नाणेनिधी संघ आणि जागतिक बँकेच्या परिषदेला उपस्थित असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनासोबतच अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी भारत सरकारच्या सुधारणांचे सकारात्मक वर्णन केल्याची महिती सीतारामण यांनी दिली आहे.

यावेळी बोलतांना भारत सरकारने रेट्रोस्पेक्टिव टॅक्स माफ केल्यानंतर अमेरिकी कंपन्यांनी त्याचे स्वागत केल्याचे देखील सीतारामण म्हणाल्या. तसेच अमेरिकी कंपन्या भारत सरकारने रेट्रोस्पेक्टिव कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहेत. आम्ही केलेल्या सुधारणा आणि विशेषत: अतिरिक्त कर रद्द करण्याचा निर्णय यामुळे अमेरिकन प्रशासनाने हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलले. कॉर्पोरेट जगतातील लोकांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पुढे बोलत असतांना अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना सीतारामण यांनी मी गुंतवणूक प्रोत्साहन करारासंदर्भात माहिती दिली. यासाठी आमच्याकडे डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. आम्ही यावर संभाषण केले आहे. दोन्ही देशांना यावर संवाद पुढे नेण्याची इच्छा आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे, असेही यावेळी सीतारामण म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!