🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई : हर हर महादेव चित्रपट बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातला होता. यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली होती. मात्र, आव्हाडांची जामीनावर सुटका झाली. अशातच भाजप (BJP) महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आव्हाडांवर ३५४ कलम लावत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींंमध्ये पुन्हा वाद, जामीनानंतर महिलेकडून गैरवर्तनाचा आरोप
- Gajanan Kirtikar | “गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच, तोपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा इशारा
- Jitendra Awhad | “नरेश म्हस्के चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद”; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
- Sushma Andhare । “बाप चोरणारी टोळी हे वाक्य ‘यांनी’ खरं केलं”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Vaijnath Waghmare | “सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात?”; वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
