Share

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींंमध्ये पुन्हा वाद, जामीनानंतर महिलेकडून गैरवर्तनाचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : हर हर महादेव चित्रपट बंड पाडण्यावरुन जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, जामीनानंतर राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडले आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे.

मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.

याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!