🕒 1 min read
Gajanan Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावर भाष्य करत काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी गजानन किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले, किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. तसंच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले आहे. त्यांच्याशी तुम्ही विश्वासघात केला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता, त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला यातही मला जायचं नाही. पण माझं असं मत आहे की, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा आणि ही गद्दारी असल्याचेही संजय निरुपम यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “नरेश म्हस्के चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद”; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
- Sushma Andhare । “बाप चोरणारी टोळी हे वाक्य ‘यांनी’ खरं केलं”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Vaijnath Waghmare | “सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात?”; वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं कारण
- T20 World Cup | रिजवानला बाद करत सॅम करनने मोडला 12 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम
- Sushma Andhare | “चार सहा महिन्यात शिंदे सरकार…”; सुषमा अंधारे यांचं भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

