🕒 1 min read
Vaijnath Waghmare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नेहमी शिंदे गटाला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिंदे गटाने मोठा डाव खेळला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar) यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारे यांनी ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याचं कारण सांगितलं आहे.
ते म्हणाले, “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले.”
पुढे ते म्हणाले, सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नसल्याचं वाघमारे यावेळी बोलताना म्हणाले.
मात्र तो सुषमा अंधारेंचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही, अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केलं. तसेच चार दिवस सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार असल्याचं वाघमारे म्हणालेत. आता यासंदर्भात वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) नेमका काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup | रिजवानला बाद करत सॅम करनने मोडला 12 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम
- Sushma Andhare | “चार सहा महिन्यात शिंदे सरकार…”; सुषमा अंधारे यांचं भाकीत
- Umesh Patil on Rajan Patil | “पोरांच्या नावाने बापाच बिल फडतो” ; उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका
- Ram Kadam | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, राम कदम यांचा घणाघात
- Eknath Khadse | “तुमच्यात हिम्मत असेल तेवढे…” ; एकनाथ खडसेंचे गिरीश महाजन यांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

