Share

Jitendra Awhad | “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात भाजप कार्यकर्ता महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याची आठवण करून देत आव्हाड यांनी ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, असं म्हंटल आहे.

ठाण्यात माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा सांगितला आहे. हे सांगत असतानाच त्यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “आनंद दिघे यांच्यावर जेव्हा ‘टाडा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली.”

“शरद पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच ‘टाडा’च्या बाहेर आले नसते,” असंही जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणालेत. “ठाण्याच्या राजकारणात स्त्रियांना वापरण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा पार पडला. ठाण्यात असं कधीही झालं नव्हतं. याउलट आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती, हा ठाण्याचा इतिहास आहे”, असं आव्हाड यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात “आनंद दिघेंची जेव्हा सुरक्षा व्यवस्था काढली होती, तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी आनंद दिघेंनी पद्मसिंह पाटलांना भेटले. माझी सुरक्षा काढू नका, अशी विनंती केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद दिघेंना जशी होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली. याच्यासाठी फार मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!