🕒 1 min read
ठाणे : कळव्यात शनिवारी घेण्यात येणाऱ्या लसीकरणाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले होते. परंतू, रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ते बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट ट्विट करून पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचं आवाहन करणारं भलं मोठं पोस्टर फाडलं. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांचे फोटो होतो. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही’, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 16, 2021
दुसरीकडे याच मुद्याला धरुन राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी समाजकंटकांना पुढील २४ तासांत पोलिसांनी अटक करावी अन्यथा कळवा पोलीस ठाण्याला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच लसीकरण मोहीम ही महापालिकेची असतांना शिवसेनेकडून लसीकरण मोहीमेच्या ठिकाणी बॅनर कसे लावण्यात आले असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच लसीकरण बनविण्याचे तंत्रज्ञान शिवसेनेने आत्मसात केले आहे का? असा सवाल त्यांनी शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

