Share

कोरोना अलर्ट! नांदेड जिल्ह्यात १३७२ नवे बाधीत, २५ जणांचा मृत्यू

Published On: 

नांदेड: जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या ४ हजार ५४९ अहवालापैकी १ हजार ३७२ अहवाल कोरोना बाधीत आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८८३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ४८९ अहवाल बाधित आहेत. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७१ हजार ७९१ एवढी झाली असून यातील ५५ हजार ९८० रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

सध्या १४ हजार २२८ रुग्ण उपचार घेत असून २३९ बाधीतांची प्रकृती अतिगंभीर आहे. १९ ते २१ एप्रिलदरम्यान २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३२२ एवढी झाली आहे. १९ रोजी यशोसाई कोविड रुग्णालय येथे नांदेड येथील ७७ वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील ६० वर्षाचा पुरुष, २० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे कैलासनगर नांदेड येथील ७० वर्षाची महिला

मुदखेड येथे २७ वर्षाची महिला, लोहा नांदेड येथील ५५ वर्षाची महिला, चितळी ता . लोहा येथील ६५ वर्षाची महिला, बामणी ता. कंधार येथील ८० वर्षाची महिला व इतर रुग्णांचा मृत्यू झाला. येणाऱ्या काळात अजून मोठे संकट ओढवू शकते म्हणून काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!