Share

पावसाचा लपंडाव सुरू, शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये – दादा भूसे

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिसांपासून राज्यात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे.

राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये, 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला तर लागवड करायला हरकत नाही. असे दादा भुसे म्हणाले आहेत. राज्यात 17 जून नंतर मान्सून पाऊस सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे. आधी लागवड झाली पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते. असे देखील कृषिमंत्री म्हणाले आहेत.

सोयाबीय पीक शेतकऱ्यांच्याकडे होते तेच बियाणे वापरात अधिक आणले जात आहे. नवीन नांवाची बियाणे राज्यात दाखल झाली आहेत. या बियाणांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. तर पिक विमा योजना अतर्गत मदत वाटपाचा कार्यकम त्वरित अमलबजावणी होत असल्याचे देखील दादा भुसे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!