मुंबई : करोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र ज्यावेळी लोक मोबाईलचे इंटरनेट कामासाठी वापरू लागले आहेत त्यावेळी त्यांना सध्याचा प्लान कमी पडताना दिसत आहे.
ग्राहकांची हीच अडचण ओळखून टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. 251 रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिलं आहे.
ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटासह एकूण 102 जीबी डेटा मिळेल. केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन असल्याने या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही.
251 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. डेटामर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड म्हणजे 64 kbps चा होईल. 51 दिवसांची वैधता असलेहा हा केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन आहे.
दोन दिवसांपूर्वीच कंपनीने आपले निवडक 4G डेटा व्हाउचर प्लॅन अपग्रेड केले, त्यामुळे आता जिओ युजर्सना 4G डेटा व्हाउचरमध्ये डबल डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.
दरम्यान, कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

