Share

जेईई ऍडव्हान्सचा निकाल जाहीर; देशात महाराष्ट्राचा चिराग फलोर अव्वल

Published On: 

पुणे : देशात कोरोनाच्या थैमानामुळे यंदा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. तर कोरोनाचा धोका बघता एप्रिल, मे मध्ये होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर सुरक्षितता बाळगत प्रवेश परीक्षा पार पडल्या होत्या.

यापैकी जेईई ऍडव्हान्सचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून देशात महाराष्ट्राचा डंका पाहायला मिळत आहे. पुण्याचा चिराग फलोर देशात अव्वल ठरला. त्याने पहिला क्रमांक पटकवला असून देशातील 1,50,838 विद्यार्थ्यापैकी 43204 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहे. कनिष्का मित्तलने देशात मुलींमध्ये बाजी मारली आहे .

दरम्यान, महाराष्ट्रतील आयआयटी मुंबई झोनचे 24 विद्यार्थ्यांनी देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या संकटाच्या काळात मानसिक तणावात देखील यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. तर, अपात्र विद्यार्थ्यांनी देखील अडचणींचा सामना करून परीक्षा दिली होती, त्यामुळे त्यांनी देखील नाराज न होता भविष्यातील इतर संधीसाठी तयारी करावी.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!