टीम महाराष्ट्र देशा : जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेची सभा रविवारी (ता. २५) रात्री बीडमध्ये झाली. नुकतेच शिवसेनेत जाऊन मंत्री झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ७५ व्या वर्षी धनुष्यबाण उचलला तर बरगड्या मोडतील. बीड शहरातील अनेक जमिनी दोन्ही भावांनी हडपल्याचा आरोप करत संस्था, दारु दुकान आणि रॉकेलचे लायसन्स यांच्याच नावावर असल्याचेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
या सर्व टीकेला काका जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पराभवाच्या मानसिकतेमधून चारित्र्यहनन करत आहे. मात्र त्यांचं चरित्र कोण तपासणार? दुसऱ्यावर आरोप करताना आपण किती चारित्र्यवान आहोत हे देखील पाहिलं पाहिजे. जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे. आगामी निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, हे दिसून येईल असं विधान केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी आता शाब्दिक युद्ध सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून क्षीरसागर कुटुंबातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. आता संदीप क्षीरसागर हे याला कसे उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे.
- ‘कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही, जो कोणी विरोधात असेल त्याच्याशी लढायला तयार’
- मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला RSSसाठी 50 कोटी रुपये दिले जातात : नाना पटोले
- मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राष्ट्रवादी
- ‘या’ दिवशी मुख्यमंत्री लिंगायत आरक्षणाचा निर्णय जाहीर करतील, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

