Share

Jayant Patil | “दसरा मेळावा ही परंपरा उद्धव ठाकरेच…”; पाटलांचा मोठा दावा

Published On: 

पुणे : पुढच्या महिन्यात असलेल्या दसऱ्याला दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र आता सद्ध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवरून हा दसरा मेळावा नक्की कोण घेणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षी शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचे आयोजन शिवसेनेकडून केलं जात. पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर झालेले 2 गट त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा नक्की कोण घेणार हा मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे मोठा निर्माण झाला आहे. एकीकडे शिंदे गट दसरा मेळावा घरण्यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहेत. मात्र दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनाच आहे असे बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनासाठी आज ते पुण्यात आले आहेत. यावेळी मानाचा पहिला गणपती पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी दसरा मेळाव्याबाबत वक्तव्य केलं आहे. यावर आपलं मत मांडत असताना जयंत पाटील म्हणाले, बाळासाहेबांची परंपरा उद्धव ठाकरे पुढे नेतील, असंही ते म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!