🕒 1 min read
Jayant Patil | मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. आता हा महामार्ग सर्वाजनिक प्रवासी वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे.
मात्र, या महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा विषय ठरला आहे. हा टोल सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारणार असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, “राज्य सरकारने मोठा थाटात समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले मात्र या महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार असून या महामार्गावरून प्रवास करताना 1 हजार ते 5 हजारांचा टोल भरावा लागणार असल्याने हा टोल सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा आहे.”
पुढे ते म्हणाले, “रस्ता उत्तम आहेच. पण मग विमानही आहेच की. विमानानं जास्त लवकर येता येईल. त्यामुळे राज्य सरकारने स्वत: काहीतरी विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. तसं यात दिसत नाही. पण तरी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका व्यक्त करू.”
दरम्यान, समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना एकूण १८ टोलनाके पार करावे लागणार आहेत. या एकूण ५२० किलोमीटर मार्गासाठी हलक्या वाहनांसाठी ८९९ रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “हेंमत गोडसे मच्छर आहे, त्याला कोणीही…” ; संजय राऊतांची जहरी टीका
- Sanjay Raut | “आमचे सरकार आल्यावर बच्चू कडू आमच्या सोबत येतील”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Bacchu Kadu | सभेतून बोलल्याने मत मिळत नाहीत ; बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका
- Ravi Rana | पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या बदलीवर रवी राणा यांची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, अजित पवारांकडून सरकारवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
