सांगली – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचं पाणी शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. त्यामुळं त्या भागातील लोकांचं स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे. साताऱ्यातील पाऊस आता उघडला आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी असल्यामुळं कोल्हापूरजवळील वाहतूक अजूनही थांबवण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 58 टक्के भरलं आहे. निफाड तालुक्यातील नांदूरमाध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या- नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरीत काही घरांची पडझड झाली. मालेगाव तालुक्यात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

