Share

Abdul Sattar । लवकरच शिवसेनेचे दहा आमदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तार

Published On: 

Abdul Sattar । मुंबई : शिवसेनेला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधून बाहेर पडले. यानंतर शिवसेना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शिंदेंनी आपला स्वतःच गट स्थापन केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही बाजूंनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर प्रबळपणे दावा केला जात आहे. त्यातच पक्षाचे नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर हे देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काल खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली.

आज शुक्रवार 29 जुलै रोजी अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा माध्यमांची बोलताना सांगितले की, अर्जुन खोतकर हे आमच्या सोबत नक्की येणार. ईडी असो किंवा काही असो, असं म्हणत त्यांनी दावा केला आहे. तर पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला केला तर लवकरच शिवसेनेचे आणखीन दहा आमदार एकनाथ शिंदे गटात येऊन मिळणार आहेत. त्यामुळे शिवसेनेवरती पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची ही माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे. अब्दुल सत्तार हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते आज दिल्ली दौऱ्यावरून परत असताना पत्रकारांची बोलताना सदरील माहिती त्यांनी दिली आहे. तर अर्जुन खोतकर हे देखील पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलेलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अर्जुन खोतकर दिल्लीत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!