🕒 1 min read
Shahjibapu Patil । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आक्रमक झाल्याचं महाराष्ट्राने पहिले. पण आज जवळपास सरकार स्थापन होऊन २६ दिवस झाल्यानंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं येत आहेत. शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही, पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढलेत. तसेच शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती, तेव्हा काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
यावर शहाजीबापू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा विषय नाही. हा तुमचा दावा आहे, मात्र सगळी काम शिंदे साहेबांकडून करून घ्या असं तर सांगायचं होतं. त्यामुळे सर्व कामे मार्गी लागली असती. कामं अडकून राहिली नसती. तसेच आमच्या एकाही पत्रावर सही झाली नाही. असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. आमची काम होत नसतील तर लोक आम्हाला मत कशी देणार? असा सवालही त्यांनी केला आहे. तर गेली अडीच वर्षे हे सगळं सोसलं मात्र मरायला लागल्यावर टाकलेले हे पाऊल होतं, असे या बंडाचं वर्णन त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा
- Baba Ramdev | रामदेव बाबांनी सुरु केली कावड सेवा; नेटकरी करतायेत ट्रोल
- Narayan Rane : उद्धव ठाकरेंना मी जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा – नारायण राणे
- Ashish Jaiswal : शिंदे-फडणवीसांची जोडी तेंडुलकर-कांबळी यांच्यासारखी; आशीष जैस्वालांचे वक्तव्य!
- Pravin darekar | बाळासाहेब कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही – प्रविण दरेकर


