Share

Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय वर्तुळातून सकाळपासूनच अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रामुख्याने भाजप नेते आणि शिंदे गटातील नेते या मुलाखतीवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळे आहे “, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती. तेव्हाही आम्हाला इशारे देत होते. आता त्यांच्याच शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं तरी देखील ते भाजपलाच इशारे देत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व फक्त भाजपमुळेच आहे. भाजपबद्दल बोलणं, भाजपला टोमणे मारणं, हे सगळं केलं तरच महाराष्ट्रात शिवसेनेला स्थान मिळेल, अशी परिस्थिती आहे. त्यांची हि वाईट खोड जाणार नाही”, असे आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!