🕒 1 min read
मुंबई : एकीकडे तौक्ते वादळाचा धोका राज्यातून टळला असला तरी त्या वादळामुळे राजकीय वादळ सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटवॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे हे शाब्दिक युद्ध केवळ शेरोशायरीमधून सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच शेरेबाजी सुरू असते. पण अमृता फडणवीस आणि चाकणकर यांनी ‘शेरनी’चा उल्लेख करत शेर तयार करायला सुरुवात केलीय. त्यांची ही शेरोशायरी सोशल मीडियावर चांगलीच शेअर होत आहे.
मुंबईत सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीच्या चाकणकर यांनी हा मजकूर अंगावर घेत याला प्रत्युत्तर दिले. ‘तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है. महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!’ असे म्हणत चाकणकर यांनी अमृता यांना डिवचले.
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है
महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !! https://t.co/rN7drFeiTu— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
यावर अमृता फडणवीस यांनीही पलटवार केला. ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !’ असे म्हणत अमृता यांनी यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर चाकणकर यांनी आणखी एक ट्विट करत अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे.
जंगल की शेरनी शिकार करती है…
सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 18, 2021
जंगल की शेरनी शिकार करती है…, सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन ! असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी थेट अमृता यांना टोला लगावला आहे. दरम्यान, या ट्विट वॉरवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्यानी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. फक्त राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केलीय.
काय म्हणाले उमेश पाटील?
राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली होती. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्याला होणार 500 रूपये दंड, वापरलेले वाहनही पोलीस घेणार ताब्यात
- मानवी स्वभावाची संवेदनशील नात्याची गोष्ट सांगणारा ‘जुन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- ७२ हजार रिक्त पदांची रखडलेली मेगा नोकरभरती मार्गी लागणार
- खतांच्या वाढत्या किंमती विरोधात बच्चू कडू आक्रमक, ताली थाली बजाव आंदोलन करणार
- ‘गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्राचा दौरा का करत नाहीत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
