Share

जालन्यातील ‘हे’ गाव ठरतंय कोरोनाचे हॉटस्पॉट!

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कधी कमी तर कधी जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेतच. गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र कोरोनाबाधित होणार्यांची संख्या मात्र काही कमी होईना. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा हे गाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारच्या अहवालानुसार २१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आन्वा गावात चांगलेच थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यापासून आतापर्यंत जवळपास शंभर रूग्ण निघाले आहे. यातील बरेच रूग्ण दुरुस्त झाले, तर काही रूग्ण दगावले आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सोमवारी आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीतून मंगळवारी तब्बल २१ रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भोकरदन तालुक्यातील कोदा तसेच तालुक्यातील इतर काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. दिवसाला पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठीच आहे. यामुळे परिसरातील प्रत्येक गावाने खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. गावात ग्रामपंचायत तसेच प्रशासन उदासीन दिसत आहे. म्हणूनच गावात रुग्ण संख्या वाढत आहे. गावात कोरोना चाचनी करण्यासाठी शिबीर घेणे गरजेचे आहे. वेळेत तपासणी तसेच उपचार झाल्यास रूग्णांची काळजी घेण्याबरेाबच त्यांचयावर उपचारही घेतले जातील. नागरिकांच्या आरेाग्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असून संबधीत प्रशासनाने या उपाययोजना राबवण्यासाठी पुढाकार घेत नियम अनिवार्य करावे अशी मागणी आन्वा येथील ग्रामस्थ जिवन देशमुख यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!