Share

जावेद अख्‍तर पुन्हा एकदा ट्रोल; ओबामा आणि शहाजहानची केली तुलना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचे गीतकार जावेद अख्तर यांची एक खास ओळख आहे. ते सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक मुद्यांवर ते आपल मत परखडपणे मांडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तुलना त्यांनी बादशहा शहाजहान सोबत केला आहे. यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली असून यावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विट नेटकरी प्रतिक्रिया देत असून विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘ओबामाचे पिता हे केनियाचे होते. त्यांच्या काकी सुद्धा आजही केनियामध्येच राहतात. ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झाला म्हणून त्यांना निवडणूकीत उभं राहण्याचा अधिकार मिळाला. शहाजहान हे भारतातल्या पाचव्या पिढीतील होते. त्यांची आजी आणि आई सुद्दा राजपूत घराण्यातल्या होत्या. पण ते आजही शहाजहानला विदेश म्हणतात.’ जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या जाता आहे.

जावेद अख्तर

फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी जावेद अख्तर यांच्या ट्विटला रिप्लाय करत लिहिले की, ‘जावेद साहेब, हे चुकीचं आहे. शहाजहान सारखं ओबामा यांच्या पालकांनी किंवा आजोबांनी अमेरिकेवर कधी आक्रमण नव्हतं केलं. ओबामा यांनी अमेरिकेतील चर्च कधी मोडली नाहीत, किंवा तलवारीने अमेरिकन नागरिकांचं धर्मांतर केलं नाही. हा एक हास्यास्पद युक्तिवाद आहे.’ असे म्हणत जावेद अख्तर यांना उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!