Share

जानी ये कश्मीर नही, भाेकरदन है!

Published On: 

जालना : भाेकरदन तालुक्यातील मुठाड, इब्रहीमपूर, तांदुळवाडी मालखेडा, आव्हाना, फत्तेपूर, नांजा, मलकापूर, मनापूर मासनपूर, प्रल्हादपूर, सिपाेरा बाजार, विरेगावसह परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने या परिसराला कश्मीरचे स्वरुप आलंय.

गारांचा मारा इतका जोरदार होता की, परिसराला कश्मीर सारखे स्वरुप प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील अनेक भागात गारांचा खच जमा झालेला दिसून आला. यात अनेकांच्या गाड्या आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह या जाेरदार पावसाने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा या पिकांचे खुप माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंब्याचा माेहर देखील गळून पडल्याने आंबा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे.

दाेन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह थंडी देखील वाढली हाेती. शेतकरी अगाेदरच मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी, काेराेना आणि आता अवकाळी पावसासह गारपीटीमुळे हवालदील झाला आहे. जोरदार वादळ-वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालय.अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे माणसांसह पशू-पक्षांचीही तारांबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!