🕒 1 min read
मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. तसेच सर्वसामान्याप्रमाणेच मनोरंज क्षेत्राला देखील कोरोनाचा फटका बसल आहे. यातच रंगभूमीवरील नाटकही बंद आहेत. याच बाबत केदार शिंदे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे.
राजकीय लोकांची जोरदार "नाटकं" सुरू असताना, झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो… पण रंगभूमीवर आमच्या "नाटकांना" मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई… #रंगभूमीसुरूकरा
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) July 13, 2021
लोकांसाठी तरी नाटकं सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत निर्माते केदार शिंदे ट्विट करत म्हणाले की, ‘राजकीय लोकांची जोरदार नाटकं सुरू असताना झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो. पण रंगभूमीवर आमच्या नाटकांना मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई…’, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
याठिकाणी आणि त्याठिकाणी… एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे… टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पहाणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहीले की, वाटतं कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचं नाही आहे?
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) July 12, 2021
तर पुढे आणखी एक ट्विट करत ते म्हणाले, ‘याठिकाणी आणि त्याठिकाणी… एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे… टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पहाणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहीले की, वाटतं कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचं नाही आहे?’, असे ट्विट करत केदार शिंदे यांनी रंगभूमी पुन्हा एकदा सुरु करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या ट्विटकडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- स्वबळाचे नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांनी फटकारले, कॉंग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सूचनावजा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
