Share

जम्मूत दहशतवादी हल्ला, महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद!

Published On: 

श्रीनगर : भारतात कोरोनाची लढाई सुरु असतानाच गेले अनेक महिने भारत-चीन तणावासह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असल्याचे दिसून आले आहे. आज जम्मू-काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी असल्याचे वृत्त आले होते. यानंतर आता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लढताना महाराष्ट्राचे वीरपुत्र नरेश बडोले यांना वीरमरण आले आहे. तर, दहशतवाद्यांनी त्यांची सर्व्हिस रायफल देखील पळवली आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये सीआरपीएफच्या ११७ व्या बटालियनमधील एका जवानावर गोळी झाडली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सद्या हा पूर्ण भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

एकाच आठवड्यात महाराष्ट्राचे दुसरे वीरपुत्र शहीद!

नरेश बडोले हे नागपूर येथे राहणारे असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना वीरमरण आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. देशाची सेवा करताना जवानांना आपला जीव गमवावा लागत असल्याने दुःख व्यक्त करत असतानाच दहशतवाद्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.’

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!