Share

‘गरिबांच शोषण हेच मोदींचं शासन’; राहुल गांधींचा मोदींना टोला

Published On: 

नवी दिल्ली : देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने ही विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

काँग्रेससह सर्वच विरोधकांनी या कृषी विधेयकांवरून देशभरात आंदोलनाचा बडगा उचलला आहे. तर अनेक शेतकरी संघटना आक्रमक होत असतानाच काही शेतकरी नेत्यांसह भाजपने या विधेयकाच समर्थन केलं असून कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल यामुळे घडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी देखील आता देशातील शेतकऱ्यांसह मजुरांच्या बेरोजगारीवरून एक खोचक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.” शेतकऱ्यांनंतर आता मजदुरांवर वार! गरीबांच शोषण, ‘मित्रांच’ पोषण, हेच फक्त मोदीजींच शासन ” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी राज्यसभेत आणखी तीन विधेयकांना संमती देण्यात आल्यावर आक्षेप घेतला आहे.

काय आहे हे विधेयक?

संसदेत बुधवारी तीन महत्वाच्या श्रम सुधार विधेयकांना पारित करण्यात आले. ज्यामुळे कंपन्या बंद करण्यात येणाऱ्या अडचणी कमी होणार आहे. जास्तीत जास्त ३०० कर्मचारी असलेल्या कंपनींना सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचाऱ्यांना हटवता येणार आहे.

महतवाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!