🕒 1 min read
औरंगाबाद –जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळं आता शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे अंबादास दानवे, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे बाबूराव कुलकर्णी आणि अपक्ष उमेदवार शहानवाज अब्दुल रहेमान खान असे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. १९ ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ कमी असलं तरी अनेक अदृष्य हात आम्हाला मदत करतील अशी आशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातल्या मतदारांची बैठक काल औरंगाबाद शहरात झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा सुरु असून या आठवड्यात निर्णयाचे अंतिम स्वरूप ठरेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
या निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९ असे मतदार आहेत.
35 अ हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, आंबेडकरांचा इशारा
आघाडीला सुरुंग : 20 आमदार माझ्या संपर्कात – महादेव जानकरांचा गौप्यस्फोट
चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
