फुलंब्री : फुलंब्री तहसील कार्यालयात तालुकास्तरीय ‘समृद्ध गाव स्पर्धा’ या संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी गावाला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी देखील गावकऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले.
प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसुळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये समृद्ध गाव स्पर्धेचे स्वरूप आणि समृद्ध गाव स्पर्धा टप्पा एक बाबत माहिती दिली. कार्यशाळेला पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेतील घटकनिहाय माहिती अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये संवाद रूपाने मांडली.
त्यानंतर जलव्यवस्थापनाचे महत्व सांगितले व शेतकरी स्वतः स्वतःच्या जलव्यवस्थापन कसे करू शकतो त्या बाबतीत अतिशय सोप्या भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण गावाचे जलव्यवस्थापन करत असतांंना पाणी फाउंडेशन कशा प्रकारे मदत करेल हे ही डॉक्टरांनी सांगितले.
समृद्ध गाव ही स्पर्धा फक्त शेतकरी, भूमिहीन,महिला बचत गट आणि गावकऱ्यांसाठी मर्यादित न राहता गावचा निसर्ग, कीटक, पशुपक्षी, प्राणी यांच्यासाठीही खूप महत्वपूर्ण आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि समृद्ध गाव स्पर्धा मधील अनेक अनुभव उपस्थितांसमोर त्यांनी विशद केले.
कार्यशाळेसाठी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी जलसंधारणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी श्रमदानासोबत शासकीय योजनेचीही जोड लावावी त्यासाठी प्रशासन गावकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल तसेच रोजगार हमी योजनेतून गावकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनाचाही लाभ घ्यावा, याबाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पानी फाउंडेशन सोबत येणाऱ्या कालावधीमध्ये काम करणार असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मनपा नोकर भरती; निवडणुकीच्या तोंडावर युवकांना दाखविले गाजर
- ईडीप्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा तूर्तास दिलासा !
- शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा, शिक्षक समितीची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन
- आकृतीबंधानुसार औरंगाबाद पालिकेची होणार आधुनिक रचना
- शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा, शिक्षक समितीची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

