🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनाच्या २ वर्षांच्या काळानंतर शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र दोन वर्षांच्या शुल्कासाठी आता शाळांनी पालकांना पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील जैन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापासून रोखले आहे. असा आरोप पालकांनी केला आहे. यावेळी शाळा व पालकांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाद उद्भवला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. वाढता विरोध पाहता अखेर शाळा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश दिला.
गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे फिसमध्ये सवलत द्यावी अशी मागणी पालकांमधून होत होती. काही शाळांनी सवलत दिली. मात्र अनेक शाळा १००% शुल्कावर ठाम राहिल्या आहेत त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनातील वाद वाढतच गेले. हा वाद न्यायालयापर्यंत गेला. शहरातील इंटरनॅशनल शाळेत यावरूनच वादास सुरुवात झाली. बुधवारी जैन इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांना गेटवरच थांबवण्यात आले.
हा प्रकार कळताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. याबाबत वाद वाढतच गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. शासनाच्या नियमानुसार पैसे भरूनही विद्यार्थ्यांना प्रवेश का दिला जात नाही? असा प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने शाळेने नमती भूमिका घेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. शाळेकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केला जात असल्याचा आरोप करत पालकांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना निवेदन दिले आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार
माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची शाळेने अवहेलना केली आहे. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापना विरोधात उच्च न्यायालयात कंटेम्ट पिटिशन दाखल करावी. शिक्षण विभागाने यासंदर्भात शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार शाळेवर त्वरित कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याची शाळेची कृती निंदनीय असून आम्ही सीबीएसई तसेच राज्य व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र पेरेन्ट्स अॅक्शन कमिटीचे उदयकुमार सोनोने यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
