Share

जय श्रीराम : गुरु माँ कांचनगिरी यांनी अयोध्याभेटीचे दिलेले निमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारले

Published On: 

मुंबई – गुरु माँ कांचनगिरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. यावेळी राज यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा सुरु झालीय.

यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं आहे.दरम्यान, निमंत्रणाचा मान राखत राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना कांचनगिरी यांच्याकडून करण्यात आली. यानंतर आता हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी आपले योगदान देण्यासाठी तसेच पाठींबा दर्शविण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत. असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!