Share

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला नवी दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात सुरुवात झाली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्ष कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर ही बैठक आयोजित केली असून बैठकीला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर प्रथमच सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक आहे.कोविड काळात पदाधिकाऱ्यांची अशी विस्तारित बैठक प्रथमच घेतली जात आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची आणि पक्षाचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी दिली जाईल. करोना काळातील हा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निवडणुकीचा रणसंग्राम आहे. यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करण्याचे भाजप समोर आव्हान आहे. तर गोव्यात तिसऱ्यांदा सत्तेवर परतण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पंजाबमध्ये अस्तित्व कामय ठेवण्यासाठी आणि मणिपूर काँग्रेसला पुन्हा पराभूत करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!