पिंपरी-चिंचवड- रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
मोदी सरकारवर आता याच मुद्द्यावरून चांगलीच टीका होताना दिसत असून खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रसरकारला लक्ष्य केले आहे. पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या गेले आहेत. कोणाला शुभेच्या द्यायच्या झाल्यास पेट्रोल आणि डिझेल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागत असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला आहे.
“पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. कोणाला शुभेच्या द्यायच्या झाल्यास पेट्रोल आणि डिझेल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. याबद्दल बोलायला देशात कोणी नाही, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकाऱ्यांचा, मध्यमवर्गीयांचा आवाज दडपला जात आहे. अशा वेळी ८० वर्षाचा तरुण पुन्हा एकदा मैदानात उतरतो त्यामुळं ही लढाई सत्येची राहात नाही तर विचारांची लढाई होते,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील समाजसुधारकांचे साहित्य ब्रेल लिपीत तयार होणे आवश्यक – भुजबळ
- तुमच्यासाठी तो महान क्रिकेटपटू असेल पण माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे : हार्दिक पांड्या
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
- साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : दिलीप वळसे-पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

