Share

‘ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवले नाही’ : चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे :  सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्याने सर्वत्र  चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवण्यात आली.  यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नसल्याचे म्हंटले आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सांगलीच्या कार्यक्रमात बोलत असताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आला. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर कधीच नाही. बांधाला बांध लागून आमचे काही भांडणही नाही. किंबहुना अनेक वेळा त्यांची स्तुती करत असताना मी सांगत असतो की प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. ‘

पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नाही.’ असे म्हणत आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? 

‘राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!