🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी सामन्यांसाठी रवींद्र जडेजाचे पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.
आगामी जुन महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू तयारीला लागले आहे. यादरम्यान भारतीय संघाचा महत्वाचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाने सोशल मीडीयावर एक फोटो शेअर केला आहे.
⏪Rewind to 90’s ???? #lovingit #india pic.twitter.com/bxqB6ptfhD
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 29, 2021
जडेजाने भारतीय संघ सामन्यात वापरणाऱ्या 90 च्या दशकातील रेट्रो जर्सी स्वेटरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्याला त्याने ‘पुन्हा 90 च्या दशकात #lovingit #india.’ असे कॅप्शन दिले आहे.
हे रेट्रो जर्सी स्वेटर भारतीय संघाच्या जर्सींसाठी सध्या प्रायोजक असणाऱ्या एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) या कंपनीने तयार केले आहे. नोव्हेंबर, 2020 पासून एमपीएल स्पोर्ट्स ही कंपनी संघासाठी जर्सी स्पॉन्सर करत आहे. याआधी देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी 1992 च्या विश्वचषकातील रेट्रो जर्सी वापरली होती.
महत्वाच्या बातम्या
- गेवराई येथे महिलेला बेदम मारहाण करत केले अत्याचार
- अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- ‘मला कसोटी क्रिकेट जास्त आवडत नाही, पण ‘या’ भारतीय खेळाडू मुळे…’
- अभिनेता व विद्यूत जामवालचं नाव जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील
- बीडमध्ये सावळा गोंधळ; मोठ्यांना सूट तर छोट्या दुकानांवर कारवाई!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
