Share

धोनीपेक्षा जास्त रक्कम देवून जडेजाला ठेवलं कायम; ब्राव्होसह बडे खेळाडू दिसणार लिलावात

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ने आयपीएलच्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) शिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मोईन अली (Moeen Ali) यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. इतर सर्व सर्व खेळाडू आता लिलावात जाणार आहेत. कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजासाठी सर्वाधिक रक्कम ठेवण्यात आली आहे.

रवींद्र जडेजाला 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीला 12 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर मोईन अलीला आठ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे धोनीच्या संघातील अनेक दिग्गज खेळाडू आता पुन्हा लिलावाच्या ड्राफ्टमध्ये जाणार आहेत. सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो ही नावे जाहीर झाली आहेत. आता तो चेन्नईच्या संघाला लिलावात परत आणू शकतो का, हे पाहावे लागेल. जडेजाच्या एवढ्या मोठ्या रकमेची कदाचित कुणालाही कल्पना नसेल. धोनीपेक्षा मोठ्या रकमेत त्याला संघात ठेवून चेन्नईने मोठा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ आहे. गेल्या वर्षी चेन्नईच्या संघाने आयपीएल जिंकले होते. जेतेपद पटकावल्यानंतर धोनी म्हणाला होता की, मी आता जात नाही. त्यामुळे आगामी मोसमातही तो चेन्नईकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

चेन्नई सुपर किंग्जने चार खेळाडूंना कायम ठेवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मोईन अलीही चांगली कामगिरी करत आहे. गेल्या दोन आयपीएलमध्ये गायकवाडने शानदार फलंदाजी केली आहे. कायम ठेवल्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!