🕒 1 min read
इंग्लंड : जागतीक कसोटी चॅम्पियशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 217 धावांची मजल मारली. यानंतर न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे 70 धावांची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. टॉम लेथम 30 रन करून आऊट झाला, अश्विनने त्याची विकेट घेतली.
न्यूझीलंडची बॅटिंग सुरू असताना 28 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर इशांत शर्माने डेवॉन कॉनवेविरुद्ध जोरदार अपील केलं, पण अंपायरने नॉट आऊट दिलं. रिप्लेमध्ये कॉनवेच्या बॅटला बॉल न लागताच ऋषभ पंतच्या हातात गेल्याचं निष्पन्न झालं. यानंतरही इशांत शर्मा अंपायरसमोर अपील करत होता. यावर विराटने इशांतला विचारलं, अंपायरला विचारत आहेस का त्याच्यावर ओरडत आहेस.
जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 3 बाद 146 पासुन पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र केवळ तीन धांवाची भर घालुन कर्णधार कोहली 44 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतने केवळ 4 धावांची भर घालुन बाद झाला. यादरम्यान अंजिक्य रहाणेने काही काळ संघर्ष सुरु ठेवला. तो बाद झाल्यावर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने काही काळ पडझड थांबवुन ठेवली. दोघांनी भारताची धावसंख्या 200 च्या पार नेली. मात्र अश्विन बाद होताच जडेजा जास्त काळा टिकु शकला नाही. आणि 92.1 षटकात भारताचा संपुर्ण संघ 217 धावांवर बाद झाला.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
