सिंधुदुर्ग : भाजपच्या चाणक्यांनी राणेंच्या गडात येवून राणेंना नाराज करणार नाही, अशी ग्वाही दिलीय. त्यामुळे खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र डागले. ‘एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल’, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली. बुडत्याला काडीचा आधार असे म्हणत राऊत यांनी राणेंना टोला लगावला होता.
विनायक राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत राऊतांचा समाचार घेतला. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे’, असा घणाघात त्यांनी केला आहे.
दरम्यान, विनायक राऊत यांनी निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. ‘निलेश राणे यांच्या या बकवासगिरीला कोकणातील जनतेने एकदा नाही तर दोनदा धडा शिकवला आहे. मारामारीची, अरेरावीची, शिवीगाळीची भाषा निलेश राणेंनाच शोभते इतर कोणाला शोभत नाही. कोकणवासीय सुज्ञ आहेत, तसेच राणेंना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे’, असे म्हणत विनायक राणे यांनी निलेश राणे यांच्यावर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अजितदादांचा राज्यपालांना सूचक इशारा !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- …तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला देखील अटक करावी; फडणवीस कडाडले
- नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं; नाना पटोलेंची खोचक टीका
- १० रुपयांच्या रिचार्जमुळे ४९ हजार गेले, काँग्रेसच्या माजी खासदाराला ऑनलाईन गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
