सिल्लोड : विहीर चोरीला गेली ही एखाद्या चित्रपटाची पटकथा नसून अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनाड शिवारात चक्क विहीर चोरीला गेल्याची तक्रार अनाड येथील शेतकऱ्याने अजिंठा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या अजबगजब तक्रारीची पोलीस प्रशासन व महसूल विभाग कशाप्रकारे चौकशी करते याची खमंग चर्चा तालुकाभर होतांना दिसत आहे. शेतात विहीर नसतांना देखील त्याची सातबाऱ्यावर नोंद होतेच कशी.?? आणि सातबाऱ्यावर जर नोंद असेल तर मग विहीर नेमकी गेली कुठे.? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील शेतकरी भावराव रंगनाथ गदाई यांची अनाड शिवारात गट क्रं.१८९ मध्ये असलेल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये सातबारा नोंदीप्रमाणे स्वतंत्र विहीर व कूपनलिका आहे. शुक्रवारी (दि.३०) सकाळी ०८ वाजता ते शेतात गेले असतांना त्यांची विहीर शेतात आढळून आली नसल्याची तक्रार त्यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात जाऊन केली.
महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
तत्कालीन तलाठी भगतसिंग पवार याने विहिरीची नोंद सातबाऱ्यावर घेतांना शासनाला अंधारात ठेवून भ्रष्ट मार्गाने सदरील नसलेल्या विहिरीची नोंद घेतली आहे. व महसूल प्रशासनाने यात अजून एक कडी जोडत ती सातबाऱ्यावर दाखवली आहे. यामुळे महसूल विभागात पैसे देऊन काहीही करता येते असा समज जनमाणसांत पसरला आहे. आता महसूल प्रशासन या प्रकरणाची चौकशी करुन तत्कालीन तलाठी यांच्यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर विहीर परत मिळावी यांसाठी शेतकरी भावराव गदाई यांनी केलेल्या तक्रारीवर काय निकाल लागतो याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास


