Share

‘एक मंत्री सकाळ-संध्याकाळ उठून कुठलातरी तंबाखू घेतल्यासारखं…’, आशिष शेलारांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. जर राज्याची बदनामी होऊ नये असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर ज्याचा जावई गंजेडी म्हणून पकडला गेला, तो मंत्री लाथ मारून मुख्यमंत्र्यांनी हाकलला पाहिजे. राज्याची बदनामी अशा मंत्र्यांमुळे होते, असेही शेलार म्हणाले.

यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’दारू आणि गुत्त्याच्या वसूलीत अधिकारी लावले जातात. त्यानंतर अधिकारी पोपटपंचीसारखं बोलतात. यातून राज्याची बदनामी होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, की देशाप्रमाणेच राज्यातही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य अपेक्षित आहे. पण राज्य सरकारचा नारा वेगळा दिसतोय. ‘काम करुँगा नही और करने दूँगा नहीं’. स्वत: काम करायचं नाही आणि कुठल्या यंत्रणांना काम करून द्यायचं नाही.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एक मंत्री सकाळ-संध्याकाळ उठून कुठलातरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय. मंत्रीमहोदयांनी शपथ कशाची घेतलीये, ते करतायत काय? कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात रोज तुम्ही बोलतायत. बाकीचे पक्ष कान-नाक-डोळे बंद ठेवून बसलेत. मोहीत भारतीय यांनी केलेल्या आरोपांवर चौकशी व्हायला हवी. नाहीतर मोहीत भारतीय स्वत:च मंत्रीमंडळातील ते नाव घोषित करतील. तसेच त्या मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवण्याचा ताठ बाणा उद्धवजी तुमच्याकडून अपेक्षित आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!